पोलिसांचे क्रौर्य थांबले पाहिजे, जयराज-बेनिक्स यांना न्याय मिळाला पाहिजे!
या पोलिसांना कठोर शिक्षा हवी, जेणेकरून लोकांशी ते क्रूरपणे वागणार नाहीत. माझ्या मते हीच वेळ आहे, पोलिसांचं मानवीकरण करण्याची आणि हे सांगण्याची की वसाहतकालीन दडपशाहीसारखी वागणूक लोकांना आता देता येणार नाही. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर आपले पोलीस जर लोकांना गुन्हेगार ठरवत असतील आणि कायद्याचा भंग करणाऱ्या गुन्हेगार नेत्यांना संरक्षित करत असतील तर त्यातून त्यांची हतबलता व्यक्त होते.......